Description
आजच्या या धकाधकीच्या काळात , प्रत्येक गोष्टींच्या लोभमुळं आपली मानवजात आपले छंद पूर्ण करण्यास मुकत आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःच्या आयुष्यात इतके व्यस्त झाले आहेत की, त्यांना आपल्या ईच्छा , अपेक्षा , आपले छंद पूर्ण करायला सुद्धा पुरेसा वेळ मिळत नाही. पूर्णपणे आपल्या कामात त्यांनी स्वतःला गुंतवलं असल्यामुळे , मनाप्रमाणे त्यांना जगता येत नाही. नेमकं स्वातंत्र्य काय असतं याची जाणीव त्यांना त्यांच्या कामाच्या व्यापामुळे कळत नाही. त्यामुळे अश्याच एक ध्येयवेड्या मात्र स्वातंत्र्य काय असत हे पुरेपूर कळणाऱ्या एक आत्मसमर्पित नक्षलवाद्याची ही कथा आहे. वाढत्या सोयी सुविधांमुळे आजच्या पिढीत एक वेगळं नैराश्य निर्माण होत असल्यामुळे त्यांना हे नक्षलवादातील एका सदस्याच उदाहरण देऊन त्यांना आपण किती सुंदर जीवन जगत आहोत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जरी प्रत्येक मनुष्यास नक्षलवादाबद्दल माहिती आहे तरी पण आत काय होत त्यांचं आयुष्य कसं असत, यांबद्दल अनेक अस्पष्ट माहिती आपल्याला आहे. याच कारण म्हणजे त्यांचं तेथील आयुष्य कसं असत ही माहिती कुठेच उपलब्ध नसल्याकारणाने तोच नेमका विषय पुस्तकात मांडलेला आहे. ज्याला स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय हे जाणून घ्यायचं असेल तर हे पुस्तक त्या व्यक्तिने जरूर वाचायला हवं.
Reviews
There are no reviews yet.